खेळ पावसाचा
ती पावसाची सर...
त्यात पडला छत्रीचा विसर...
अलीकडे मी होते...
पलीकडे तो होता...
त्याच्या हातात छत्री होती...
मला मात्र खात्री होती...
चालुच होती पावसाची सारीवर सरी...
माझी नजर त्याच्यावरच भीर भीरी...
पावसाच्या प्रत्येक दवबिंदुने छत्री असुनही चिंब चिंब केले होते त्याला...
हट्टीच होता पाऊस देखील...
माझ्यासाठीच असेल कदाचित...
कारण रुप त्याच सौज्यन्य होत....
ओल्या त्या कपड्यामध्ये अंग त्याच सुंदर दिसत होत...
ओल्याचिंब केसांमध्ये अलगद हात फिरवत होता...
हाताच्या कोप-यापर्यंत शर्टाच्या प्लेत्या होत्या...
पारदर्शी शर्ट होत अंगत्याच प्रदर्शित होत होत...
स्वताला पावसात सावरत होता...
स्वताच्या वस्तुंना तितकाच आवरत होता...
पण पाऊसही मात्र जास्तच हट्टी होता...
माझ्यासाठीच असेल कदाचित...
पावसाने मात्र एक वस्तु त्याची...
अलगद वा-यासह माझ्याजवळ आणली...
दुसर तिसर काही नसून...
ती त्याचीच ति छत्री होती...
पावसाचा खेळ पाहुन...
हास्य त्याच उमलल...
त्याच संधीची वाट पाह्त होती...
माझ देखील हद्य हुळहुळल...
आजही आठवतो तो पावसाचा खेळे...
एकाच छत्रीत त्याचा आणि माझा मेळ...:)
-वैष्णवी-
No comments:
Post a Comment